सद्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू असून शेकऱ्यांना पेरणी करण्यासाठी पाण्याची आवशकता आहे. त्यातच शेतीला रात्रीची वीज मिळत असल्याने शेकऱ्यांना रात्री शेतात जाऊन शेतीला पाणी करावे लागते. या मुळे अनेकदा जंगली प्राणी, वाघ, जंगली डुक्कर, विंचू, साप या मुळे अनेकदा अपघात होऊन प्रसंगी जीवितहानी सुद्धा होते त्यामुळे या सगळ्यांची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांना दिवसाला किमान १२ तास तरी वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी प्रहाचे जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण यांनी महाराष्ट्र विज वितरण परिममंडळ कडे निवेदनतुण केली असून त्याची एक प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे.
त्यामुळे विज वितरण कंपनीने शेतकऱ्याच्या या समसेकडे लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिवसाला किमान १२ तास विज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करण्यात आली.
त्यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण शेगाव यांचे सह युवराज मेश्राम गुजगाव्हण, नामदेव राजनहिरे गुजगव्हाण, अमित नन्नावरे जामणी आदी शेतकरी उपस्थित होते.






