spot_img
spot_img
23.8 C
New York
Saturday, August 1, 2026

भद्रावतीत गरबा दांडिया उत्सव सोत्साह संपन्न…


समितीच्या वतीने आकर्षक बक्षिस वितरण….


भद्रावती येथील सेवादल मैदान, नगर परिषद च्या बाजूला या ठिकाणी भद्रावती दांडिया गरबा उत्सव समितीमार्फत तीन दिवसीय गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २१ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत चाललेल्या “भद्रावती गरबा दांडिया उत्सव समिती” महोत्सव स्पर्धेचा समारोप मान्यवरांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. यावेळी दांडिया स्पर्धेसाठी अनेक गरबा गृप नी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

भद्रावती गरबा दांडिया महोत्सवातील स्पर्धेत विजेत्या संघांना आणि व्यक्तींना बक्षिसे देण्यात आली. गृप मधील प्रथम पारितोषिक डॉ. माला प्रेमचंद यांच्या हस्ते ११,१११/- रूपये रोख ए बी गृप आणि रामलीला गृप यांना देण्यात आले.
द्वितीय पारितोषिक मा. महेंद्रभाऊ गावंडे यांच्या हस्ते ८,१११/- रुपये रोख भद्रावती ग्रुप ला देण्यात आले. तृतीय पारितोषिक लोकमत सखी मंच व इनरव्हील क्लब यांच्या हस्ते ५,१११/- रुपये रोख क्षत्रिय कस्तीया ग्रुप ला देण्यात आले.
तसेच वैयक्तिक बक्षीस मध्ये – बेस्ट किंग सावन आत्राम , बेस्ट वुमन रिना बोढाले, बेस्ट लूक साक्षी मेश्राम, बेस्ट कपल प्रज्ञा धुळे व रिना बोढाले , बेस्ट किड्स शिफा पवार यांना आकर्षक बक्षीस, शील्ड व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . सोबतच या स्पर्धेदरम्यान प्रश्नमंजुषा कार्यक्रम प्रेक्षकांकरिता घेण्यात आली. सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना गिफ्ट व्हाउचर व रोख रक्कम समितीमार्फत देण्यात आले. या स्पर्धेत अनेकांनी आपल्या उत्कृष्ट नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व भद्रावतीकरांचे आपल्या न्यृत्य कलेने मन जिंकले.

या समारोपीय कार्यक्रमात बोलताना समितीचे उपाध्यक्ष श्री. विक्रांत राजेश बीसेन यांनी सांगितले की, भद्रावती गरबा दांडिया उत्सव समितीचा महोत्सव व ही स्पर्धा ही भद्रावतीतील जनतेसाठी एक लोकप्रिय सण व आनंदोत्सव आहे. या महोत्सवामुळे भद्रावती शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. नवीन येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होऊन यामुळे होणाऱ्या कलागुणाचा प्रोत्साहन मिळते असे यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नायब तहसीलदार भांदककर साहेब, माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर, ए पी आय वर्मा पोलीस स्टेशन भद्रावती, विमला इन्फ्रास्ट्रक्चर महाप्रबंधक महेंद्रभाऊ गावंडे, माजी नगरसेवक रेखाताई खुटेमाटे, स्वाती चारी प्रा.वर्षा धानोरकर, कीर्तीताई गोहणे, सुनंदा खंडाळकर ,माजी नगरसेवक शारदाताई ठवसे, माजी नगरसेवक प्रशांत डाखरे, तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष – स्वप्निल मत्ते, उपाध्यक्ष – विक्रांत बिसेन, सचिव – निखिल उंबरकर, सहसचिव. श्वेता उंबरकर, कोषाध्यक्ष – सोनल उमाटे , सहकोषाध्यक्ष मनोज पेटकर, समिती प्रभारी अंकित तोडे, व इतर सदस्य , प्राध्यापिका रश्मी बीसेन, सौ.केशनी हटवार , हर्षदा हिरादेवे, आशिष मल्लेलवार, प्रज्ञा धुळे, सचिन पाटील, नितेश बानोत, अक्षय लोहकरे, बंटी रायपुरे, रीना बोढाले, समय हिरादेवे, प्रशिक लोणारे, सपना कुटेमाटे व समस्त भद्रावती कर व हेल्पिंग हँड्स एनजीओ, श्री बिसेन कम्प्युटर एजुकेशन,रोटरी क्लब, लोकमत सखी मंच, इनरव्हील क्लब, ऑल रिलीजन युथ फाऊंडेशन ,स्वराज्य वीर संघटना, सेवा फाऊंडेशन असे विविध संघटनांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!