नागरी येथील प्रभाग क्रमांक 3 येथे बेघर वस्ती मागील ४० वर्षा पासून आहे. परंतु ती वस्ती नाला लगत असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर घरात घसून खूप मोठ्या प्रमाणावर घरातील साहित्यांची नुकसान होते. त्यामुळे घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

या पट्टे धारकांकडून ग्रामपंचायत ला नियमित घरपट्टी कर नियमित भरल्या जातो. परंतु नागरिकाकडून वारंवार नाला सबली करण व पुनर्वसन मागणी करून सुद्धा त्यावर तोडगा अद्यापही निघाला नाही. त्यांना घर पट्टे नसल्याने शासकीय योजनेचा लाभ सुद्धा मिळत नाही. गेले ४० वर्ष पासून हे तिथे राहत असल्यामुळे नागरी येथील प्रभाग क्र. ३ येथील नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून तहसीलदार वरोरा यांचे कडे केली आहे.






