भद्रावती : येथील भंगाराम वार्ड निवासी उज्वला गिरीधर नागोसे यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी बहाल करून नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी ‘डाॅ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी विषयक विचार, भूमिका आणि योगदान’ या विषयावर गोंडवाना विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला. त्यांनी हा प्रबंध चंद्रपूर येथील डॉ.खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. जे.एम.काकडे, आई, वडील, पती, सासू, सासरे, सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराला दिले आहे.

उज्वला नागोसे ह्या येथील आयुध निर्माणीतील कर्मचारी युवराज तराळे यांच्या पत्नी असून त्या उत्तम गृहिणी आहेत. घरातील सर्व कामे सांभाळून त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून डी.एड. आणि बी.एड. या व्यावसायिक पात्रताही प्राप्त केल्या आहेत.






