भद्रावती : तालुक्यात जर कुनाला विचारले कि गतिरोधकाचे गाव कोणते? तर आपसुकच एकच नाव समोर येईल ते म्हणजे “माजरी”. असे का ? तर गावतील रस्ते आणि रस्त्यावरील गतिरोधक गाव सुरु झाल्या पासुन गावातील रस्ता संपत पर्यंत तब्बल २८ गतिरोधक आहेत. वाहनांची गती वाढु नये तथा अपघात होऊ नये म्हणुन गतिरोधकाची निर्मिती केली जाते. परंतु गावातील फक्त २ किमी च्या अंतरामधे तब्बल २८ गतिरोधक म्हणजे सरासरी काढल्यास 70-75 मिटर वरती एक गतिरोधक. त्यातही रस्त्यावरील खड्डे हे सुद्धा गतीरोधकाचे काम बजावताना दिसतात. गतिरोधक असने हे फायद्याचेस असते मात्र माजरीतील हे गतीरोधक डोकेदुखी ठरत आहेत. अवाढव्य बेढप असे गतिरोधक निर्माण करुन ठेवले आहेत त्यामुळे गाड्या खालुन घासत जातात. त्यातही भर म्हणजे अरुंद रस्ते. एकतर अनेकांना मनक्याचा व कमरेचा त्रास वाढला आहे. विशेष म्हणजे गावातील एका बाजुला लोक वस्ती, कर्मचारी वर्ग वास्तव्य करतो तर दुसर्या टोकावर वेकोली एरीया दावाखाना आहे. आपातकालीन एख्याद्याला दवाखान्यात नेण्याचे झाल्यास ५ मि.चा रस्ता हा १५ मि. मध्ये परावर्तीत होतो. ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा ह्या समस्येकडे कानाडोळाच केल्याचे दिसत आहे. ह्या गतिरोधकांमुळे होणार्या नुकसानीला जबाबदार कोन ? असा प्रश्ना गावकरी तथा प्रावसी करत आहेत.
सावकाश ! पुढे गतिरोधकाचे गाव आहे !
२ किमी च्या अंतरामधे तब्बल २८ गतिरोधक






