spot_img
spot_img
21.2 C
New York
Friday, July 31, 2026

शेगाव परिसरात अवैद्य देशी दारू व्यवसायात वाढ…..

चंद्रपूर जिल्हा अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना दिले अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदन…

चंद्रपूर जिल्हा अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना दिले अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदन….

  शेगाव बु हे दहा हजार लोकवस्तीचे वरोरा तालुक्यातील गाव असून या गावात अवैध सट्टापट्टी तसेच परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात सट्टा तसेच अवैद्य देशी दारू चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असून पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील गावात भांडणे, तंटे, मारामारी तसेच चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून परिसरात ग्रामीण भागात  अशांतता निर्माण झाली आहे....

तालुक्यातील शेगाव मध्ये परवानगी प्राप्त दोन बियर शाँपी,पाच बार, व दोन देशी भट्टीचे दुकान आहे, या शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 100 गावे येत असल्याने हद्दीतील काही गावांमध्ये अवैद्य देशी दारूच्या महापूर मोठ्या प्रमाणात पसरलेला असून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. यामधून पोलीस विभाग महिन्याकाठी लाखोंची कमाई करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे..
शेगाव मध्ये देशीभट्टीचे वैद्य दोन दुकानें असल्याने ग्रामीण भागात अवैध दारू येत तरी कुठून, तसेच पुरवठा करणारे याच्या मात्र थांगपत्ता पोलीस प्रशासनाला नाही हे मात्र जनतेला न समजल्या सारखे कोडेच आहे….
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेगाव बु, आष्टा, वडाळा, किनाळा, कोकेवाडा,अर्जुनी तुकुम,वायगाव,बेंबळा,साखरा, ईतर गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विकल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैद्य देशी दारू विक्रेत्यांनी दारू पिणाऱ्या ग्राहकांसाठी टेबलची सोय, थंड पाणी, तसेच चकना इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या असल्याने गावातील तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी नशेच्या आहारी गेले असल्याने अर्जुनी तुकुम गावातील महीलानी याची जाणीव घेत ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये ठराव घेत अवैध दारू बंदीसाठी ठराव सर्वांनु मते समस्त महिला सहित लेखी रिपोर्ट पोलीस स्टेशन शेगावला देण्यात आली होती, पोलिसांनी ग्रामसभेच्या ठरावायची दखल घेत अवैध देशी दारू विक्रेत्यावर कारवाई करत काही काळासाठी दारू विक्रीला गावात आळा बसवला परंतु अवैध देशी दारू विक्रेते पोलीस प्रशासनाला न जुमानता पुन्हा अवैध दारू विक्री जोरदार सुरू करत पोलीस प्रशासन समोर अवैध दारू विक्रेते सैराट होवून प्रशासनावर वरचढ होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..
गावातील महिलांनी,मुलींनी अवैध दारू संदर्भात बोलल्यास अवैध दारू विक्रेते अश्लील भाषेत महिलांना बोलत असतात त्यामुळे या त्रासाला कंटाळून अर्जुनी गावातील महिलांनी जिल्हा अधिकारी,तसेच राज्य उत्पादन शुल्क यांना गावातील अवैध देशी दारू बंद करून कारवाई करण्यासाठी निवेदन दिले असून कारवाई न झाल्यास चंद्रपूर जिल्हा अधिकारी, जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याच्या इशारा निवेदनातुन दिलेले आहे….

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!