भद्रावती : डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात येथील लोकमान्य विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. कु.लक्ष्मी सुनील बदखल हीला या परीक्षेत ९५.६९ टक्के गुण मिळाले आहेत. तर कु. चैतण्या रवींद्र लाटेलवार हीला ९२.५४ टक्के गुण मिळाले आहेत. सदर शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच असते. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे सलग चार वर्षे शिष्यवृत्ती मिळते.

या दोन्ही विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका भारती येरेवार यांना देतात. त्यांच्या यशाबद्दल लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, मुख्याध्यापिका आशालता सोनटक्के, उपमुख्याध्यापक सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रुपचंद धारणे, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.






