२१ मे ला रविवारी भद्रावती येथे आयोजन
भद्रावती : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांची समग्र माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. यासोबतच इयत्ता १० व १२वी नंतर काय? स्पर्धा परीक्षांची तयारी व व्यक्तिमत्त्व विकास कसा साधावा? अशा महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थी व पालकांचे मार्गदर्शन व्हावे या हेतूने विवेकानंद महाविद्यालयात कार्यशाळेची आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक वक्ते गोंडवांना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.यासोबतच श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिंपरी, वर्धा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कालभूत व्यक्तिमत्व विकास, छत्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा, चंद्रपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिलीप चौधरी हे लक्ष्य स्पर्धा परीक्षेचे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी दिनांक २१ मे २०२३ रोज रविवारी सकाळी १० वाजता विवेकानंद महाविद्यालयातील महायोगी श्री अरविंद सभागृहात होणाऱ्या या निःशुल्क आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष पुरूषोत्तम स्वान यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.






