spot_img
spot_img
23.4 C
New York
Saturday, June 6, 2026

सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनल मुळे शाळेचे इमारतीत आग

शाळेतील वीज उपकरणे व इतर साहित्य जळून खाक

दोन लाख रुपयांचे नुकसान : वरिष्ठांकडे तक्रार

भद्रावती : तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनलमुळे शाळेच्या इमारतीस आग लागून शाळेतील संपूर्ण वीज उपकरणासह इतर महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक 17 मे ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
सीएमपीडीआय वरोरा द्वारा दिनांक 17 मे ला तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सौर ऊर्जा पॅनल बसविले होते. त्यामुळे अचानक बिघाड होऊन शाळेच्या इमारतीस सकाळी 9 वाजता आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असून शाळेतील संपूर्ण विद्युत उपकरणासह इतर साहित्य जळून खाक होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची तक्रार शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह ग्राम पंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी तहसीलदार भद्रावती, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती, यांचे सह पोलिसात केली. या घटनेची चौकशी करून नुकसान भरपाईची मागणी ग्रामपंचायत सरपंच पानवडाळाचे महाकुलकर यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!