वादविवाद , वक्तृत्व मंडळाचे उद्धघाटन कार्यक्रम
जुन्नर :
श्री शिव छत्रपती महाविद्यालयात वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे उद्धघाटन समारंभ नुकतेच संपन्न झाले . या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील विद्यावाचस्पती प्रा. डॉ पांडुरंग कंद , समन्वयक , मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य हे होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी, उपप्राचार्या व समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते व एमसीव्हीसी विभागप्रमुख प्रा कुंडलिक नेटके व वरिष्ठ विभाग वादविवाद वक्तृत्व मंडळाचे प्रमुख डॉ वंदना नढे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा सारीका सोनार हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख होते डॉक्टर पांडुरंग यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते विद्यावाचस्पती प्रा. डॉ पांडूरंग कंद, समन्वयक, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी “वक्तृत्व कला ही प्रत्येकानी आत्मसात करावी. मानवी जीवन समृद्ध करण्याकरीता व व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी वक्तृत्व कला ही काळाची गरज आहे. शारिरिक देहबोली , वाचन , मनन व चिंतनाने ही कला विकसित होते. यासाठी आपणास कधी, कुठे, काय बोलावे हे ज्याला जमले तो वकृत्व स्पर्धेत यशस्वी होतो .आजच्या काळात या कलेस खूप मागणी व संधी आहे”, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ महादेव वाघमारे म्हणाले आमच्या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी हे वक्तृत्व कलेमुळे महराष्ट्रात विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सारीका सोनार यांनी केले तर पाहुण्याचा परिचय प्रा योगेश घोडके यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आरती जराड व आभार प्रा लता बेळे यांनी केले . कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.






