spot_img
spot_img
32 C
New York
Saturday, June 6, 2026

मतदान व मतमोजणीच्या प्रक्रिये करिता प्रशासन सज्ज

भद्रावती : प्रदीर्घ कालावधी पर्यंत प्रशासकीय कारकिर्द असणाऱ्या नगर परिषद भद्रावती ला नगराध्यक्षासह प्रभाग निहाय नगरसेवक मिळण्याची प्रक्रिया अवघ्या दोन दिवसात संपून ३ डिसेंबर ला मतमोजणी नंतर अधिकृत विजयी उमेदवार घोषित होणार आहे.२ तारखेला मतदान प्रक्रिया आणि ३ तारखेला मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने जवळपास ५०० कर्मचारी नेमले आहेत.

शहरातील विविध ३२ इमारतीत ६३ मतदान केंद्रे राहतील. पोलिंग बूथ पार्टी ६३ सह प्रसंगी राखीव पथके म्हणून ९ पथके तैनात करण्यात आली आहे. झोनल ऑफिसर ०७ सह ३ डिसेंबर रोजी मतमोजणी करिता एकूण ९८ कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडतील. मतमोजणी केंद्रावर एक निवडणूक अधिकारी, एक सहाय्यक निवडणूक अधिकारी, एक अतिरिक्त सहाय्यक अधिकारी नेमल्या गेले आहेत. निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरक्षित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तासह मतदान व मतमोजणी प्रक्रियेत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी राहतील. असे नगर परिषद भद्रावती च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!