spot_img
spot_img
25 C
New York
Thursday, July 30, 2026

शेतकऱ्याने चालवला सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर

हाताशी आलेले पीक काढूनाही उत्पन्न खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल

एकीकडे संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात असताना जगाचा पोशिंदा मात्र अंधारात

शेगाव पासून जवळच असलेल्या तालुक्यातील वडधा तुकूम या गावातील शेतकरी दिलीप नारायण दरेकर यांनी शेतात उभ्या असलेल्या पाच एकर शेतातील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवला असून सम्पूर्ण पिक नष्ट केलेले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात महागडी बीजे, खत आणि औषधी घेऊन सोयाबीन पिकाची लागवड केली असता. आगस्ट सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टी मुळे तसेच पिकावर आलेल्या येलोमोझाक या रोगामुळे तसेच बोगस बियाणामुळे अनेक शेतकरी सोयाबीनचे नकदी असलेले पिके या पासून वंचीत झालेले आहे.

एकीकडे वरोरा तालुक्यातील जवळपास 50 टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल कापण्यापेक्षा त्यावर रोटावेटर फिरवणे तसेच कापलेले पीक जाळणे हेच पसंत केले आह. याचे कारण की सोयाबीनचे एकरी उत्पन्न हे 50 किलो पेक्षाही कमी होत असून कापणी खर्च व काढणी खर्च सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्याने रोटवेटर चालवून सोयाबीनचे पिक नष्ट के आहे. एकीकडे शेतकरी सांगतात मशीनच्या सहाय्याने सोयाबीन काढले असता बाजारात सोयाबीनला फक्त पाचशे ते हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळतो त्यामुळे लागवड खर्च सुद्धा निघत नसल्या करणाने हा माल काढून बाजारात नेण्यापेक्षा जाग्यावर रोटावेटर मारून जमीन पुढील हंगामासाठी तयार करणे हे उलट सोयीस्कर होईल हा उद्देश ठेवून काळजावर दगड देऊन शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शेतकरी हे सांगत आहे. 3/4 दिवसा आधी सुद्धा वरोरा तालुक्यातील चेक कवडापूर या गावच्या पंकज मागरुडकर या शेतकऱ्याने सुद्धा अशाच प्रकारे 13 एकर उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाच्या शेतीवर रोटवेटवर चालवले होते व असंचे तालुक्यातील कित्तेक शेतकरी रोज आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटवेटर चालवत आहे. व राज्य सरकारने जे तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केली ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी मात्र अंधारातच जाणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदील झालेला आहे. या राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती ती संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पादन बाजार समिती चारगाव संचालक अभिजीत पावडे, अल्पभूधारक शेतकरी शेरखान पठाण, विलास बोडे, रमेश चौधरी, चंद्रशेखर झाडे, विनोद निमकर, प्रफुल माथनकर, खुशाल झाडे, रामा घुगरे, नीलकंठ बुरान, विलास खिरडकर, गणपत झिले, सदानंद घाटे, आदी शेतकऱ्यांनी केली आहे…

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!