झालेला मृत्यू हा नेमका अपघात कि घातपात?
अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण?
पावसाळा संपताच वरोरा भद्रावती तालुक्यात अवैध रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली असून रात्र दिवस खुलेआम छातीठोक पणे अवैध रेती तस्कर खुल्या मुकसा करून अवैध गौण खनिज लूट होत आहे. यातच काल सायंकाळच्या सुमारास दिवाळीच्या दिवशी एका इसमाचा आष्टा नदीपात्रातू अवैध रेती उपसा करताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे..
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास परिसरातील काही रेती तस्कर अवैध उपसा करण्यासाठी गेले असता चिमूर तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी प्रमोद रामभाऊ शरकुरे वय वर्ष 34 याच्या घटनास्थळावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
एकीकडे रेती तस्कर मोठ्या प्रमाणात हे रेतीचा उपसा करून वाटेल त्या चढ्या भावाने गरजुनची लूट करत सहा ते सात हजार रुपये प्रति ट्रॅक्टर रेती विकत असून यावर अंकुश लावणे महसूल प्रशासनाला मात्र काही शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. सूत्रांच्या माहिती नुसार प्रमोद शेरकुरे हा काही दिवसाआधी शेगाव ला त्याच्या भाऊजी कडे घरकाम बांधकामासाठी आला असून तो शेगाव मध्येच राहत होता काही अवैध रेती तस्कर यांणी त्याला रेती घाटावर चोरीच्या मार्गाने रेती तस्करी करण्यासाठी सोबत नेले अशी माहिती मिळाली असून त्याचा तिथेच मृत्यू झाला आहे.
शेगाव पोलीस घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उत्तरणी तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आले असून शेगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे…
त्याचा नेमका मृत्यू हा कशामुळे झाला व हा नेमका अपघात आहे कि घातपात कि आणखी काही हेच शोधणे पोलिसासमोर महत्वाचे असून परिसरात जनतेच्या मनात या घटनेला खरंच घात की अशी चर्चा परीसरात बोलल्या जात आहे…






