spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

अजय दर्वे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन


भद्रावतीत एक साहित्यिक आदर्श उपक्रम

भद्रावती :-

शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी अजय निळकंठ दर्वे यांच्या घरगुती गणेशोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाने शहरात एक नवा आदर्श स्थापित केला आहे. भद्रावतीमध्ये मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही दुसऱ्यांदा असा साहित्यिक उपक्रम पार पडला, ज्यामुळे शहरात साहित्य आणि संस्कृतीला एक खास वळण मिळाले. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री अजय दर्वे यांच्या घरी असलेल्या घरगुती गणेशोत्सवानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन केले. या कवी संमेलनामुळे नवीन मुलांना साहित्याची ओढ लागेल व पुढे तेही मोठे साहित्यिक बनतील, असे ते आपल्या प्रास्ताविकातून म्हणाले.

  या कवी संमेलनाचे अध्यक्षपद  पी. एम. चिडे , माजी प्राचार्य, लोकमान्य महाविद्यालय, भद्रावती यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य वरिष्ठ महाविद्यालय वरोराचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक श्री चंद्रशेखरजी वाटकर, यांची उपस्थिती विशेष ठरली. संमेलनात श्री गणेशाच्या महात्म्यावर आधारित विविध कवींनी त्यांच्या कविता सादर केल्या, ज्यात झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव शालिकजी दानव उर्फ शालिकदा (बालकवी) , तर ज्येष्ठ कवी सु. वि. साठे , मुजुमदार सर, कौरासे सर, राणाजी वाणी, विवेक महाकाळकर, अजय दर्वे, प्रशांत उज्वलकर, बालकवी मास्टर मयंक दर्वे, प्रविण आडेकर, महेंद्रसिंग या कवींनी आपल्या कविता सादर केल्या, तसेच कमल  दर्वे यांनी भजन तर कु.  सुहानी दर्वे हिने आपली कविता सादर करून कवी संमेलनाला दुजोरा दिला. अध्यक्ष श्री पी.एम. चिडे यांनी हा उपक्रम खूप चांगला चांगला आहे. अनेकांनी असे उपक्रम राबवावे असे भाष्य केले, तर प्रमुख अतिथी म्हणून असलेले श्री चंद्रशेखरजी वाटकर यांनी यातून नव्या साहित्यिकतेला चालना मिळेल आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे, नवीन आणि युवा पिढीला सुद्धा तसेच घरगुती उपक्रम केल्यामुळे छोट्या मुलांना सुद्धा साहित्यिकतेच महत्त्व कळेल, अशाप्रकारे साहित्यिक क्षेत्रात नवीन साहित्यिकांची भर पडेल, अशाप्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच झाडेबोली साहित्य मंडळाचे सचिव श्री शालिकजी दानव  यांनी सुद्धा आपल्या भाषणातून कवी संमेलनाचे व कवितेचे महत्त्व पटवून दिले.

    संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे एक सर्जनशील आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. 

या कार्यक्रमात सौ. वैशाली वाटकर (एकर्जुना), निळकंठराव दर्वे, सौ शालिनी अजय दर्वे, विजय दर्वे, सौ. कमल चिडे, श्रीमती संध्या खनके, सौ. प्रज्ञा देशमुख, निलम चिडे, शर्वरी वाटकर, गणेश सूर्यवंशी, श्रावणी दर्वे, सुधाकर गिरडकर, नंदा गिरडकर, माणिक आत्राम तर बल्लारशाह येथून आलेले श्री शिवशंकर दर्वे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.

   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस दर्वे व शाश्वत पाऊणकर यांचे सहकार्य अधिक मोलाचे ठरले. हा कार्यक्रम झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावतीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यांच्या सहभागाने संमेलनाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत उज्वलकर यांनी केले तर आभार अजय दर्वे यांनी मानले.

अजय दर्वे यांच्या या घरगुती उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी साहित्यिकतेला एक नवीन दिशा मिळाली असून, हे आयोजन भविष्यातील साहित्यिक उपक्रमांसाठी प्रेरणादायक ठरले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!