spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

वरोरा महसूल पथकाची शेगाव बु परिसरात २ दिवस २ कारवाया

इतर राज्यातील नोंदणी असलेले वाहनाची चंद्रपूर जिल्ह्यात अनधिकृत पणे वाढणाऱ्या संख्येकडे लक्ष देणार कोन?

माहिती देण्यास मात्र तहसीलच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ

वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरोरा तहसील च्या महसूल पथकांनी २ दिवसात २ वेगवेगळ्या कारवाया केल्या आहे. या मध्ये २ दिवस अगोदर मंडळ अधिकारी बऱ्हाणपूर यांनी शेगाव बु ते टेमूर्डा रोड वर रात्रीच्या सुमारास अवैध पणे मुरूमची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ३४ सी. डी. १५ ४० हा मुडके क्र. व ट्राली बिना नंबर चि यावर कारवाई करत शेगाव पोलीस स्टेशन ला लावण्यात आलेली आहे. बऱ्हाणपूरे यांनी आपल्या पथकासह या वर कारवाई करून अहवाल वरोरा तहसीलदार यांना सादर केला अशी माहिति मिळालेली असून हे ट्रॅक्टर व ट्राली मेसा येथील खाटीक चि असल्याची माहिती आहे.

त्या वर अजून किंति दंड आकारण्यात आला याची अध्यापही माहिती मिळालेली नाही.

तसेच काल रात्री वाहन क्र. ए. पि. ०२ टी. एफ. १६९३ हे १२ चाकी हाईवा वाहन अवैध रित्या रात्रीच्या सुमारास मातीची वाहतूक करताना मंडळ अधिकारी निखाळे यांनी रात्रीला गस्तीवर असताना पकडले असल्याची माहिती आहे. हे वाहन सुद्धा पोलीस स्टेशन लावण्यात आलेले आहे. परंतु काल पासून आमचे प्रतिनिधी यांनी मंडळ अधिकारी तसेच वरोरा तहसीलदार यांना फोन द्वारे वारंवार सपंर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अजूनही फोन उचललेला नाही. विशेष म्हणेज १ दिवस आधी पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली वर वाहन क्र. नाही तसेच काल रात्री पकडण्यात आलेले हाईवा हे माहिती नुसार एस. आर. के. कंपनी मध्ये वरोरा चिमूर महामार्ग कामामध्ये वापरण्यात येत होते. परंतु एस. आर. के. कंपनीचे काम हे मागील २ वर्षा पासून बंद आहे. मग हे वाहने वापरत तरी कोन होते? हे वाहन आंध्रप्रदेश मध्ये नोंदणी असून मागील २ वर्षा पासून महाराष्ट्र मध्ये बिना टॅक्स भरता राजरोसपने कोणाच्या आशीर्वादाने दिवसरात्र वरोरा चिमूर रोड वर फिरत होते. या वाहनाची संपूर्ण कागदपत्रे सम्पलेली असताना परिवहन विभाग व वाहतूक विभाग यांना हे दिसत नव्हते का? आणि जर अशा प्रकारचे आणखी काही वाहने अन्य राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात विना टॅक्स भरता राजरोसपने फिरत असतील व कमाई करीत असतील तर त्याला जबाबदार कोन? राज्य सरकारचा लाखो रुपयाचा टॅक्स बुडत असताना त्या कडे लक्ष देणे परिवहन विभागाचे काम नाही का? राज्यातील इतर छोटा मोठ्या वाहनावर परिवहन विभाग रोज कारवाई करीत असतो तर मग इतर राज्यातील वाहणाची चंद्रपूर जिल्ह्यात वाढणारी स्थायि संख्या या कडे परिवहन विभाग आता तरी लक्ष देणार का?

तसेच या २ दिवसात शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरोरा महसूल पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाई मध्ये तहसील कडून काही सावरासावर तर केली जात नाही आहे ना? अशा एक ना अनेक प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात व चर्चेचा विषय बनला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!