spot_img
spot_img
20.7 C
New York
Thursday, July 30, 2026

दोन वर्षापासून जलजिवनची कामे कासवगतीने…

ठेकेदाराने गावातील सम्पूर्ण रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना होत आहे त्रास..

तालुक्यात शेगाव बु मध्ये मागील दोन वर्षापासून जलजीवांचे कामे सुरू आहे. मात्र काम अजुनही परिपूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. ठेकेदारानी रस्त्यावरून वाँटर पाईप टाकून रस्त्याला मधोमध खोदून ठेवला असून ठीक ठिकाणी गावात मुख्य वाहतूक रस्तेवर सलाख, गिट्टी पसरलेली आहे त्यामुळे दुचाकी वाहन स्लिप होऊन दररोज छोटे छोटे अपघात होत असून नागरिकांना दुखापत होत आहे. ठेकेदाराचा चुकीमुळे जलजिवनची कामे न झाल्यामुळे ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून नागरिकांना पिण्याचे पाण्याची आवश्यकता पडत असते. पण अजून किती दिवस पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागेल असा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवले आहे. दोन वर्षापासून लाखो रुपयाची जलजीवांची कामे शेगाव मध्ये सुरू आहे. पण अजूनही शेगाव च्या नागरिकांना रोज नळाचे पाणी मिळत नाही.

तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शेगाव ची ओळख आहे. शेगावची लोकसंख्या दहा हजार च्या वर असून या ठिकाणी सोमवारला मोठा आठवडी बाजार भरत असून जवळपासचे ७० ते ८० गावातील नागरिक, बाजारामध्ये येत असतात परंतु या ठिकाणी नागरिकांना व दुकानदारांना वाहन पार्क करण्याकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणीच्या सामना करावा लागत आहे..
या ठिकाणी मुख्य रस्ता खोदलेल्या असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर किराणा दुकान, कपड्याची दुकान, हार्डवेअर, जनरल दुकान, पुस्तकांची दुकान, कृषी केंद्र, नाश्ता, चपला जुते ची दुकाने, भाजीपाला, फळे दुकाने, फुलाची दुकान इतर दुकाने असून याच रस्त्यावर दवाखाना व फार्मसी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पेशंटला तसेच ग्राहकांना नेहमीच अरुंद रस्त्यामुळे वाहन पार्क करायचा कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे..
शेगावमध्ये नेहरू विद्यालयकडे जाणारा रस्ता, तसेच गुजरी भरण्याचे ठिकाण, इंडियन बँककडे जाणारा रस्ता, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाहतूक सुरू राहते. त्यातच अरूंद रस्ता ठिकठिकाणी खोदून असल्याने दोन्ही बाजूला वाहन उभे राहत असल्याने दुकानदारासहित ग्राहकांना, जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या ठिकाणी ग्राहकाकरीता वाहन उभी करण्याकरीता कुठले प्रकारची जागा नसून ठीक ठिकाणी वाहन उभी ठेवल्या जात असते त्यामुळे तिथून येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनास अडचणी निर्माण होत असून सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वरोरा, चिमूर ३५३ ई राज्य मार्गावर दोन्ही बाजूला वाहने उभी करण्याकरीता नागरिकांना आसरा घ्यावा लागत असून काही नागरिकांना पेट्रोल पंपच्या पटांगणामध्ये पार्किंग म्हणून गाडी लावत असतात…

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!