बेरोजगारी मुळे आणखी एक बळी
शेगाव बु मधील बेरोजगार युवक आकाश गुलाब काथवटे वय वर्षे २८ याने आज सकाळी अंदाजे ९/१० च्या सुमारास आपल्या राहत्या घरीच पंख्याला लटकून आपली जीवन यात्रा सम्पवली.
सविस्तर वृत्त असे कि आकाश हा बेरोजगार असून वडिलांच्या पाणटपरी वर हातभार करीत असे. घरी शेतीवाडी नसल्या कारणांनी एकट्या पाणटपरीच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्या कारणामुळे बेरोजगारी त्याला नेहमीच सतावत असायची. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्या कारणांनी व वाढत चाललेल्या वयामुळे त्रस्त झालेल्या आकाशला जीवन जगून संघर्ष करण्यापेक्षा जीवनायात्रा संपवणे अधिक सोयीस्कर वाटले असावे.
आज सकाळी तो घरी एकटाच असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. वडील पान टपरी वरून जेवण करायला घरी आल्या नंतर हा सगळा प्रकार उघळकीस आला. हे सगळं डोळ्यांनी पाहताच त्यांच्या पाया खालची जमीन सरकली.
आकाशच्या पशच्यात त्याचे वडील, आई, मोठा भाऊ, वाहिनी, असा बराचसा आप्त परिवार आहे.
अशा प्रकारे बेरोजगारी मुळे आणखी एका युवकांचा बळी गेल्या कारणांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. व सरकार आता तरी रोजगारा बद्दल काही सकारात्म्मक विचार करणार का? अशा भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे.या घटनेचा पुढील तपास शेगाव चे ठाणेदार योगेंदसिंग यादव यांचे मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे..






