spot_img
spot_img
22.6 C
New York
Wednesday, July 29, 2026

नवीन खरेदी केलेल्या कचरा कुंडी पडल्या धूळ खात

शेगाव ग्रामपंचायत कडून शासनाच्या निधीचा वापरावर प्रश्न

तालुक्यातील शेगाव बु ग्रामपंचायत सध्या चांगलीच चर्चेत येत आहे. जनतेच्या समस्या बद्दल उदासीन असलेली ही ग्रामपंचायत नेहमीच जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे.
त्यातच आता देशभर स्वच्छ भारत मिशन सुरु असताना शेगाव ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरत आहे. मागच्याच आठवळ्यामध्ये शेगाव मधील विविध समस्याना वाचा फोडण्याचे काम गावातील नागरिकांनी केले असताना या आठवळ्यात कचरा कुंडी प्रकरण समोर आले आहे. या मध्ये शेगाव ग्रामपंचायत ने मागील वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये ५ ते ६ लाख रुपये किमतीच्या जवळपास १०० हुन अधिक कचरा कुंडी गावामध्ये चौका चौकात लावण्यासाठी खरेदी केल्या होत्या. यात ग्रामपंचायत मध्ये असलेल्या निधीतुन हा खर्च करण्यात आला.

परंतु मागील वर्षभरापासून या कचराकुंडी गावातील अंगणवाडी क्र. २ मध्ये एका खोलीत धूळ खात असल्या कारणाने जनतेला त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे शेगाव ग्रामपंचायत मध्ये हे चालले तरी काय? जनतेच्या कामासाठी आलेल्या निधीचा हा असा दुरुपयोग शेगाव ग्रामपंचायत कोणाच्या आशीर्वादाने करीत आहे. जर या कचारा कुंडी लावायच्या नव्हत्या तर त्या खरेदी केल्या कशाला? या कचरा कुंडी प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करतील का? असे अनेक प्रश्न गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!