भद्रावती / प्रतिनिधी
स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी, भद्रावती येथे भारतीय भाषा उत्सवा निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत विविध ग्रंथ ठेवण्यात आले. भाषांच्या माध्यमातून एकता उपक्रमांतर्गत त्यात ऐतिहासिक ग्रंथ, कादंबरी, संदर्भ ग्रंथ, विश्वकोश, कथासंग्रह, कवितासंग्रह, विविध प्रसिद्ध लेखकांचे विविध पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ जयंत वानखेडे, माजी प्राचार्य तथा विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधीर मोते , ग्रंथपाल विजया मुक्तावरम, हे प्रामुख्याने उपस्थितीत होते. उद्घाटन प्रसंगी डॉ जयंत वानखेडे यांनी “विद्यार्थ्यांनी वाचन करून आपले व्यक्तिमत्व प्रभावी करावे” असे मार्गदर्शन केले.

या ग्रंथ प्रदर्शनीचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. ग्रंथप्रदर्शनीच्या यशस्वितेसाठी डॉ. ज्ञानेश हटवार, रमेश चव्हाण, कवडू पोलेवार यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रदर्शनीला महाविद्यालय व विद्यालयातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भेट दिली.






