भद्रावती
इनरव्हील क्लब भद्रावती तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. यातीलच एक उपक्रम इनरव्हील क्लब भद्रावती आणि
सुरभी कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११/१२/२०२४ ला कामगारांना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब भद्रावती च्या अध्यक्षा प्रेमा पोटदुखे तसेच सुरभी कन्स्ट्रक्शन चे सुनीलभाऊ पोटदुखे व इतर सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष, सौ.प्रेमा पोटदुखे, सचिव, सुनिता खंडाळकर, मनीषा ढोमणे, रश्मी बिसेन, केशरी हटवार , तृप्ती हिरादेवी, राजश्री बत्तीनवार, विश्रांती उराडे, वैशाली सातपुते, वर्षा धानोरकर, शुभांगी बोरकुटे, जयश्री कांबळी तसेच इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी कामगार मंडळी च्या चेहऱ्यावरील हास्य टीपण्यासारखे होते.






