वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील घटना
जवळपास चार तास दोन्ही बाजूची वाहतूक ठ्ठप
दरम्यान जमवानी रस्त्यावर टायर जाळून घटनेचा निषेध दर्शवीला
चार तास नंतर चंद्रपूर दंगा नियंत्रक पथक दाखल
आज सकाळी ७ च्या सुमारास शेगाव वरून जवळ असलेल्या भेंडाळा पाटीवर दुचाकी व एसटी महामंडळाच्या बस च्या झालेल्या धडकेत १५ वर्षे दुचाकी चालक सृजल राजू साळवे घटनास्थळी ठार झाला असून मागील चार तासापासून महामार्गावर तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार सृजल हा रविवार सुट्टी असल्यामुळे बजाज कंपनीची सिटी १०० बाईकने क्र. एम. एच. ३४ बी. एस. ९४४६ गावातून शेतामध्ये जात असताना बाईक चढत असताना चिमूर आगाराच्या बस क्र. एम. एच. ४० बी. एल. ३९८८ चिमूर चंद्रपूर सुपर बसणे धडक दिल्यामुळे जागेवरच ठार झाला. ही धडक एवढी भीषण होती की सृजल हा धडक बसताच बसच्या काचेवर जाऊन आदळला. बाईक बसच्या समोरील चाकात येऊन १०० मीटर घासत गेली.

ही घटना गावकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना माहिती होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले व जोपर्यंत राष्ट्रीय महा मार्ग बांधणारे कंपनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मोबदला देत नाही तसेच गावातून मुख्य महामार्गांवर येणारा रस्ता करून देण्याचे अशावसानं देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय महामार्ग मागील चार तासापासून रोखून धरलेला आहे. स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण जमाव आपल्या अटीवर कायम राहिले.

शेवट दोन तासानंतर चिमूर पोलीस उप अधीक्षक राकेश जाधव हे घटनास्थळी पोहोचुन सुद्धा जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मृतदेह उचणार अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे महामार्ग सुरळीत करण्यात आला नव्हता. रस्ता बांधकाम कंपनी व नागरिक यांच्यात बोलचाल सुरू असून मागील चार तासापासून राष्ट्रीय महामार्ग हा ठ्ठप पडून दोन्ही बाजूला वाहणाच्या लाबंच लांब रांगा लागलेल्या आहेत.
अखेर चार तास नंतर जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कुठलीही अनुचित घटना घडू पोलीस विभागाकडून दंगा नियंत्रण पथक पाचरण करण्यात आले.

ही घटना झाल्या नंतर घटना घडलेल्या एस. टी. बस चे चालक जवळील पोलिस स्टेशन येथे स्वतःहून जमा झाले
वृत लिहत पर्यंत ४ तास उलटूनही अजून पर्यंत मृतदेह उचला नसल्या कारणाने तोडगा न निघाल्याने अजूनही वाहतूक दोन्ही बाजूला ठ्ठप होऊन आहे.






