चंद्रपूर
नवरात्रीचे शुभ पर्वावर माता महाकाली मंदिर परिसरात माता महाकाली महोत्सवाचे आयोजन चंद्रपूर चे आमदार किशोरभाऊ जोरगेवार आणि चांदा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे . या महोत्सवात विविधांगी कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. यातीलच एक भाग म्हणून निमंत्रित कवयित्रींचे कविसंमेलन नुकतेच माता महाकाली मंदिर परिसर चंद्रपूर येथे संपन्न झाले. सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर आणि झाडिबोली साहित्य मंडळ चंद्रपूर यांच्या सहयोगाने हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले.
जेष्ठ साहित्यिक डॉ पद्मरेखा धनगर, प्राध्यापक, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कवी संमेलनात चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील निमंत्रित कवयित्रींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. कवी संमेलनाचा विषय महिला जागर हा होता. या विषयाला अनुसरून सर्व कवयित्रींनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या.
या कविसंमेलनात कवयत्री नीता कोन्तमवार, भारती लखमापूरे, वरोरा, स्वेता चंदनकर, सीमा पाटील, आरती रोडे, वरोरा, मंजुषा दरवरे, चंद्रपूर, संगीता धोटे, सविता कोट्टी, अर्चना पोटे , कल्पना गेडाम, अर्पणा नैताम , वृंदा पगडपल्लिवार, संगीता बांबोडे, किरण चौधरी, प्रीती जगताप, केशनी हटवार, भद्रावती, तनुजा बोढाले, चंद्रपूर, धनश्री चन्ने, रोशनी दाते आदी चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री यांनी सहभाग घेतला.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन गीता रायपुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्निल मेश्राम यांनी केले. सुर्यांश साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, इरफान शेख, समन्वयक, सुनील बावणे, स्वप्निल मेश्राम आदींनी हे कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.






