शांतता कमेटी शेगाव व मार्केट लाईन शेगाव यांच्या तर्फे स्पर्धेच आयोजन
वरोरा :-
दि. १० ऑक्टोबर
तालुक्यातील शेगाव बु मध्ये नेहरू विद्यालय तथा नेहरू जुनियर कॉलेज च्या भव्य पटांगणावर शांतता कमेटी शेगाव बु व व्यापारी मार्केट लाईन शेगाव बु यांचे यांचे संयुक्त विद्यमाने गरबा व दांडियाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये गावातील एकूण २६ मंडळानी सहभाग घेतला होता. एकापेक्षा एक असे सुंदर गरबा व दांडिया या सगळ्यानी सादर केला तसेच सगळ्या मंडळानी वेगवेगळी सुंदर अशी वस्त्रे महिलांनी परिधान केली होती.

संपूर्ण स्पर्धा पार पडल्या नंतर सहभागी सर्व महिला मंडळाला शांतता कमेटी व मार्केट लाईन व्यापारी मंडळ यांच्या कळून प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. त्या नंतर प्रथम क्रमांक अष्टभुजा दुर्गा महिला मंडळ ( अक्षरा कोटकर आणि ग्रुप ), द्वितीय क्रमांक महालक्ष्मी दुर्गा महिला मंडळ ( पटेल भाभी व ग्रुप ), व तृतीय क्रमांक बक्षीस शक्ती दुर्गा महिला मंडळ ( गीताताई घुमे व ग्रुप ) यांना देण्यात आले.
या साठी पर्यवेक्षक म्हणून राखी इतकेपल्लीवार, शुभांगी नौकरकर व ख़ुशी नौकरकर हे होते. तर विशेष अतिथी म्हणून पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार योगेंदसिह यादव व नेहरू विद्यालय चे प्राचार्य बालाजी ढाकुणकर हे होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शांतता कमेटी शेगाव , पोलीस कर्मचारी शेगाव, मार्केट लाईन व्यापारी मंडळ शेगाव व समस्त गावकरी शेगाव यांनी मोलाचे सहकार्य केले






