spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

मराठी भाषा अभिजातच…

अनेक वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम….

अभिनंदनाचा ठराव घेऊन
महासंघाने मानले शासनाचे आभार..

नागपूर

माय मराठीला अडीच हजार वर्षांपेक्षा जुनी परंपरा असून मराठीला आद्यग्रंथकार मुकुंदराज, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकडोजी महाराजांपर्यंत व अनेक साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची अनमोल देणगी मराठी साहित्य विश्वाला देवून समृध्द केले आहे. जगातील असंख्य विद्यापीठात मराठीला श्रेष्ठ दर्जा प्राप्त झालेला असून मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी मराठी भाषकांचे योगदान मोलाचे आहे.

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाविषयी राज्य सरकार, केंद्र सरकार, साहित्यिक आणि मराठी भाषकांच्या योगदानाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने नुकतेच आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा. दिलीप जाधव, खजिनदार, सांगली यांनी केले. तर सभेच्या बैठकीची भूमिका आणि ठराव महासंघाचे सचिव , बाळासाहेब माने, मुंबई यांनी मांडला. त्या ठरावाला डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर , सुरेश नखाते नागपूर व सर्वांनी अनुमोदन दिले, व सर्वानुमते ठराव संमत झाला. यावेळी कार्याध्यक्ष, संपत गर्जे, पुणे, उपाध्यक्ष, डॉ प्रतिमा बिस्वास, मुंबई, उपाध्यक्ष, डॉ ज्ञानेश हटवार, चंद्रपूर, डॉ मनिषा रिठे, प्रा. विजय हेलवटे, चंद्रपूर, बापू खाडे, पुणे, दीपा ठाणेकर, मुंबई, मंजिरी गजरे, ठाणे, ओमप्रकाश ढोरे, अमरावती, विजया मने, गडचिरोली यांनी आपल्या मनोगतातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्वच मराठी साहित्य संस्था , अभ्यासक मराठी विषय शिक्षक, प्राध्यापक , मराठी भाषकांबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून सुनील डिसले यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महासंघाने केलेला संघर्ष, चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन वरोरा येथे घेण्यात आलेल्या महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात घेतलेले ठराव, त्याचा केलेला पाठपुरावा आणि या संघर्षाचे मिळालेले फळ, राज्य व केंद्र सरकारचे योगदान, साहित्यिकांचा पाठपुरावा यामुळेच हे शक्य झाले. या बद्दल सर्वांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केला.

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णक्षण आहे.
सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या मराठी भाषेला तिच्या समृद्धीसाठी खऱ्या अर्थाने राजमार्ग मिळाला. मराठी विषय शिक्षक महासंघाने प्रामुख्याने इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा सर्व विद्याशाखा अनिवार्य व्हावी, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रामुख्याने लढा दिला. स्वयंभू असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने ती जगमय होईल यात शंका नाही..”
प्रा. बाळासाहेब माने, सचिव, मराठी विषय शिक्षक महासंघ ,महाराष्ट्र राज्य.

नवरात्री, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वप्रथम मी एक मराठीचा पाईक म्हणून स्वागत करतो !

      'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे' या कवी माधव जूलियन यांच्या काव्यपंक्ती मराठी माणसांच्या जिभेवर रुळल्या असल्या तरी, काळाच्या प्रवाहात वस्तूस्थिती बदलली आणि १९६५ पासून मराठी बोली भाषा न राहता ती राजभाषा झाली. १९६५ पासून ते २०२४ पर्यंत म्हणजे जवळपास ५९ वर्षानंतर माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या तीन तपापासून ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष,  अप्रत्यक्षपणे या लढ्यात सहभाग घेतला त्यांचे आणि विविध संस्था, साहित्यिक, संघटना आदींनी जे योगदान दिले त्या सर्व महानुभावांचे मनस्वी आभार!
    *यहि पवार, अभ्यासक (जील्हा प्रतिनिधी, यवतमाळ)*

या आभासी सभेला डॉ. शरद दुधाट, अहमदनगर, मीनल पाटील, नंदुरबार, व्यंकट दुडीले, बीड, सुरेश नखाते, नागपूर, नीता खोत, नागपूर, गिरीश काळे, वर्धा, योगेंद्र सनेर, धुळे, चांगदेव खोले, नाशिक, रेखा कटके, रायगड, सुनील कारवखे, हिंगोली, नामदेव मोरे, चंद्रपूर, संतोष कोठावळे, धाराशिव, संतोष कदम, जळगाव, स्मिता भुसे, अहमदनगर, भाग्यदेवी चौगुले, रत्नागिरी, अंजना खताळ, मुंबई, बाबासाहेब माळवे, कोल्हापूर, यशवंत पवार, यवतमाळ, अरविंद मोडक, पुणे, निलेश पाकदुने, अकोला, पवन कटरे, गोंदिया , विनोद हटवार, भंडारा यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील समस्त सदस्य व राज्यातील ३५ जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आभासी सभेचे सूत्रसंचालन सचिव, बाळासाहेब माने, मुंबई यांनी केले तर सभेचे आभार कोषाध्यक्ष, प्रा. संजय लेनगुरे, भंडारा यांनी मानले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!