भद्रावती तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत
भद्रावती, दि.०६ : अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती तालुक्याची नविन कार्यकारिणी डॉ. नारायण मेहरे, विदर्भ प्रांत अध्यक्ष, नितीन काकडे, विदर्भ प्रांत सचिव आणि वसंत वर्हाटे, जिल्हा संघटक, चंद्रपूर याच्या सुचनेनुसार तयार करण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती तालुक्याची नविन कार्यकारिणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वांच्या संगनमताने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून बालाजी दांडेकर, उपाध्यक्ष मोहन मारगोनवार व शोभा साखरकर, सचिव प्रवीण चिमुरकर, सहसचिव करूणा मोघे, कोषाध्यक्ष सुदर्शन तनगुलवार, संघटन मंत्री शेखर घुमे व शिला आगलावे, प्रसिद्धी प्रमुख वतन लोणे, महिला प्रमुख माया नारळे, मार्गदर्शक वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते तर कार्यकारिणी सदस्य म्हणून गुलाब लोणारे, केशव मेश्राम, विठ्ठल ढवळे, दाजीबा बांबोळे, माधव कौरासे, किशोर सातपुते, शिला चामाटे, गीता जयपूरकर आणि लिला ढवळे यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी भविष्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य समोर नेत ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावून समाजपयोगी कार्य करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.






