शांतीचा मुलमंत्र अंगीकारण्याची गरज… डॉ जयंत वानखेडे
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालक यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व प्रा. किशोर ढोक, रमेश चव्हाण उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले. प्रा. किशोर ढोक यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या वेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ सुधीर होते यांनी केले तर आभार प्रदर्शन भिष्माचार्य बोरकुटे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोढ्या संख्येत उपस्थित होते.






