spot_img
spot_img
26.2 C
New York
Sunday, August 2, 2026

शिंदे महाविद्यालयाचा खो- खो संघ विभागावर…

सर्वत्र खेळाडूंचे कौतुक..

भद्रावती

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे दिनांक २८/९/२०२४ ला पार पडल्या. या जिल्हास्तरीय स्पर्धेत १९ वर्ष मुले वयोगटात अंतिम सामन्यात शिंदेवाही या संघाचा दारुण पराभव करत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती या संघाने घवघवीत यश संपादन केले व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. ९/१०/२०२४ ला गडचिरोली येथे विभागीय खो खो स्पर्धेत हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जिल्हास्तरावर खो खो स्पर्धेत अव्वल येऊन विभाग स्तरावर निवड झाल्याने खो खो खेळाडू संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार ,माधव केंद्रे, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक, शुभम सोयाम, जिल्हा खो खो प्रशिक्षक युवराज भारती, प्रशांत बडगुलवार, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व गडचिरोली येथे विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!