गोंडवाना विद्यापीठाचे दिक्षांत समारोह थाटात साजरा…
चंद्रपूर
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा ११ व १२ व्या दिक्षांत समारंभात थाटात पार पडला. या समारंभात तळोधी येथील प्राध्यापक डॉ योगीराज नगराळे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल, कुलपती के. सी. राधाकृष्ण, नामदार नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार, डॉ. प्रशांत बोकारे कुलगुरू , प्र कुलगुरू डॉ श्रीराम कावळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ योगीराज नगराळे यांनी जेष्ठ साहित्यिक , समिक्षक, माजी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हरिश्चंद्र बोरकर आणि चुडाराम बल्हारपुरे यांच्या प्रकाशित नाटकांचा तौलनिक अभ्यास या विषयावर संशोधन केले .
गोंडवाना विद्यापीठात आयोजित दिक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित झाल्या नंतर ज्यांच्या नाटकांवर संशोधनात्मक लेखन केले, ते नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी आपल्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाचा सन्मान केला. लेखकाने आपल्या निवासस्थानी बोलवुन अभ्यासक डॉ. योगीराज नगराळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, डॉ. जनबंधु मेश्राम, डॉ रामचंद्र वासेकर आणि मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल डॉ ज्ञानेश हटवार, डॉ.धनराज खानोलकर, डॉ प्रकाश वटी, डॉ राजकुमार मुसळे, डॉ. माधवी भट आदींनी त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या मित्रमंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






