spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

विविध संदेश देत शेगाव मधील मस्कऱ्या गणपती विसर्जन

डिजे व ढोल तश्याच्या तालावर नाचत तरुणाई ने हातात पोस्टर धरून दिले समाजाला विविध संदेश

आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून गणेश मंडळाचे स्वागत

शेगाव दि. ०३ ऑक्टोबर

तालुक्यातील शेगाव बू येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरा होत असून येथील विसर्जन वरोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असते. त्यामुळे परिसरात विसर्जन करिता नामांकित आहे विशेष म्हणजे शेगाव नगरी मध्ये ” मूर्ती लहान कीर्ती महान ” अशी परंपरा कायम करिता प्रत्येक मस्कऱ्या गणेश मंडळांचा लाखो रुपयांचा खर्च असून आपला गणेश मंडळ सर्वाधिक सुशोभित कसा दिसेल या कडे प्रत्येक मंडळाचे अधिकाधिक लक्ष असते.

तेव्हा सर्वस्वी मंडळ डीजे , ढोल ताशे , फटाक्याची आतषबाजी , सुशोभित देखावे , अश्या अनेक उपक्रमाने शेगाव नगरी तसेच परिसरातील नागरिकांचे मने मोहून टाकतात. त्यामुळे येथे परिसरातील हजारो गणेश भक्त शेगाव नगरी मध्ये दाखल होऊन या आनंदक्षणी सहभागी होतात. गणेश भाविक भक्ताच्या सुख सोई करिता अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, मसाले भात, भोजन दान, यांची विशेष सोय उपलब्ध केली जात असते .


गणेश विसर्जन पाहण्याकरिता परिसरातील लाखो भाविक येत असल्याने या आनंदमय सुखमय क्षणी काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शेगाव येथील ठाणेदार योगेंद्रसिंग यादव याचे मार्गदर्शनात चौका चौकात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक मुळे समाजातील विविध पक्षाचे पदाधिकारी व जामा मस्जिद व शांतता कमेटी शेगाव यांचे कडून ठीक ठिकाणी पेंडाल घालून सगळ्या गणेश मंडळाचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


विसर्जन मिरवणुकीत मध्ये एकूण १४ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. अखेर हे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे सहकार्य केले. तसेच ग्रामपंचायत शेगाव, शेगाव पोलीस स्टेशन, शांतता कमेटी , तंटा मुक्त समिती , गावकरी तसेच राजकीय कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य करून मस्कऱ्या गणेश विसर्जन मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडला…..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!