भद्रावती, दि.०८ : मागील कित्येक वर्षापासुन माजरी गावाच्या रस्त्याची डागडुजी सूद्धा करण्यात आली नाही. माजरी वेकोली मार्फत गावाच्या विकासासाठी मिळणारा निधी जातो कुठे? असा प्रश्न आम जनतेला पडला आहे. माजरी येथील दवाखान्या पासुन ते शिरना नदी व रेल्वे स्टेशन पर्यंतचा मुख्य रस्ता पुर्णता खराब झाला असुन ग्रामपंचायत ने तर कानाडोळा केलाच आहे तरी वेकोली प्रशासनाने सुद्धा डोळेझाकुन केवळ कोळसा उत्खननाचे काम सुरु ठेवले आहे. दोन दिवसा आधी ह्याच रस्यावरील खड्यांमुळे रिक्षा उलटल्याने दोन महीला गंभीर जखमी झाल्या.

माजरी ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळखल्या जाते. १७ लोकप्रतीनिधी असलेल्या गावाची अशी दुर्दशा पाहुन लोकप्रतिनिधी कुठल्या कामाचे? असा संतप्त सवाल माजरीतील जनता करत आहेत. राजरोसपणे ग्रामपंचायत मार्फत वेकोली ला उत्खननासाठी नाहरकत प्रमानपत्र देण्यात येते. पण सुविधांसाठी कुठलाही पाठपुरावा केल्या जात नाही, असे ह्या मुख्य रस्ताची दुर्दशा पाहुन वाटायला लागले असल्याचा एकच सुर गावकर्यांमार्फत केला जात आहे. ह्या खराब रस्त्यामुळे जीवित हानी होणार नाही तो पर्यंत कुणाला जाग येणार नाही असेच वाटत आहे. तरी हा मुख्य रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी गावकर्यांची इच्छा असुन गावकरी प्रतिक्षेतच दिवस काढत आहेत.






