भद्रावती, दि. ०८ : गेल्या काही दिवसांपासून भद्रावती शहरात डेंगूचा प्रादुर्भाव वाढतअसून डेंगूच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. डेंगू ची लागण होऊन शहरातील संताजी नगर व दाते सोसायटी मधील दोन महिला दगावल्या आहेत. ही गंभीर बांध लक्षात घेऊन शहरातील डेंगूच्या प्रादुर्भावावर त्वरित आळा घालण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणीचे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे प्रदेश सचिव इमरान खान यांच्या नेतृत्वात नगरपरिषद भद्रावती ला निवेदन देण्यात आले. सदर गंभीर बाबीची दखल न घेतल्यास भाजयुमो तर्फ या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला आहे.

“दोन दिवसात यावर उपाययोजना सुरू करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी शिष्टमंडळास दिले आहे.”
यावेळी निवेदन सादर करताना भाजयुमोचे प्रदेश सचिव इमरान खान, जिल्हा महामंत्री अमित गुंडावार, विशाल ठेंगणे, श्रीपाद भाकरे, शिवा पांढरे, केतन स्वान, अमर महाकुलकर, मनोज आष्टुनकर आदी उपस्थित होते.






