spot_img
spot_img
24.2 C
New York
Tuesday, August 4, 2026

श्री संत गोरोबा काका ४६ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम 

विद्यार्थ्याने चार शक्ती संपादन केल्या पाहिजेत : प्रा. सुरेश परसावार  

भद्रावती, दि.08 : येथे नुकताच श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी महोत्सव ४६ वा कार्यक्रम कुंभारपुरा येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश परसावार साहित्यिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजु गैनवार माजी नगरसेवक, शेषानंद पांडे महाराज, सुधाकर उत्तरवार सामाजिक कार्यकर्ते, सुकदेव साठे कवी लेखक इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी वॉर्डातील मुख्य मार्गाने ग्रामसफाई, घटस्थापना व मूर्तीचे अभिषेक, रांगोळी स्पर्धा, महिला संमेलन, सामुदायिक प्रार्थना व चिंतन, गोरोबा काका यांची भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे राजु वालदे, राजु गैनवार, ॲड प्रमोद गेडाम यांची उपस्थिती होती. रात्रौ जाहीर कीर्तन व प्रबोधन व नंतर जागृती भजन करण्यात आले.अध्यक्षीय भाषण करताना प्रा. सुरेश परसावार म्हणाले की, जे जे संत महापुरुष झाले त्यांनी सर्व जगाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे पण आमचे दुर्दैव्य असे की त्यांना आम्ही जाती धर्मात विभागून टाकले आहे. संतांनी केलेल्या कार्याचा वारसा आम्ही चालविला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी साजरी केल्याचे समाधान मिळेल. शिक्षण सर्वांनी घेतले पाहिजे त्या शिवाय कोणाचाही उद्धार होणे शक्य नाही. करिअर घडवत असताना चारित्र्याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. च्यारीत्रहीन उच्चशिक्षित व्यक्ती समाजाला घातक आहे. विद्यार्थ्याने चारशक्ती संपादन केल्या पाहिजेत शारीरिक, बौद्धिक, नैतिक आणि आध्यत्मिक बल प्राप्त करणारा व्यक्ती स्वतःचा कुटुंबाचा समाजाचा आणि रास्ट्राचा विचार करून काही कर्तव्य पार पाडू शकते. उच्च शिक्षणाबरोबर संस्कारित व्यक्ती घडविण्याची आज आवश्यकता आहे. व्यक्तीमत्व विकास शिबिर, संस्कार वर्ग, विविध प्रकारचे सन उत्सव कार्यक्रम यातून माणूस घडत असतो. म्हणूनच कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करीत राहणे आवश्यक आहे.

दुसऱ्या दिवशी भूपाळी, हरिपाठ, महाआरती, संताची अंभगवानी यानी सुरूवात केली. यावेळी प्रमुख पाहुणे सुरेश सेंगमवार होते. आरोग्य शिबिर ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांच्या वतीने राबविण्यात आले. दुपारी शिक्षण प्रबोधन, मार्गदर्शन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. गोपाळ काला ह.भ.प. सुवर्णा पिंपळकर यांच्या वाणीतून गोपाळ काला यावर प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळी पसायदान व महाप्रसादाची व्यवस्था केली.कार्यक्रमाचे संचालन राखी वाणी, प्रास्ताविक झनक चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल खांदारे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करणे करीता राजु वालदे, प्रवीण गिरोले, दिलीप खांदार, गणेश वाणी, संदीप ठाकरे, शबू कपाट, वर्षा खोबरे, कविता व्यवहारे, शीला बोरसरे, गणपत ठाकरे, मनोज बोरसरे, रामाजी खांदार, अरुण पाठक, दामोधर वालदे, रामकृष्ण खोबरे, प्रभाकर वाणी, दशरथ वरवाडे, शामराव ठाकरे, महादेव पाडवार, बेलुजी खापनवाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!