भद्रावती – तालुक्यातील चिरादेवी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा काशिमाय देवस्थान समिती च्या पुढाकाराने १ जानेवारी २०२४ ला ठरल्याप्रमाणे यात्रा भरत असते. याठिकाणी गोपाळकाल्याचे किर्तन आपल्या भद्रावती येथील ह.भ.प. गुणवंत कुत्तरमारे (भद्रावतीकर ) यांच्या हस्ते होणार आहे. तरी देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान केले आहे.







