भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे व्यसनमुक्ती कार्यशाळा घेण्यात आली. सुदृढ निरोगी समाज निर्मितीसाठी व्यसनमुक्त भारत या कार्यक्रमा अंतर्गत व्यसनमुक्तीचा हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तथा भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व भारतातील शाळांमध्ये राबविला जात आहे. त्या उपक्रमाअंतर्पगत आपल्या यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते सर तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शिका म्हणून ब्रह्माकुमारी राज योगिनी कुंदादीदी चंद्रपूर, भद्रावती शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रफुल भाऊ चटकी, राजयोगिनी अर्चना दीदी व सुजाता दीदी उपस्थित होत्या.
निरोगी सुदृढ भारत निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्त समाज असणे आवश्यक आहे. संपूर्ण भारतभर व्यसनमुक्ती अभियानांतर्गत अनेक कार्यक्रम देशभरात राबवले जात आहेत. आपल्याला विद्यार्थी दशेपासूनच व्यसनमुक्तीची शपथ घेणे आवश्यक आहे. व आपल्या परिसरात वेसन करणाऱ्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे आवश्यक असल्याचे मत मार्गदर्शक कुंदादीदी यांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नशा मुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री शरद राजूरकर सरांनी केले. मनीष वाकडे सरांनी विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा म्हणून घेतली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुनील वैद्य सरांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी यशवंतराव शिंदे विद्यालयातील समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






