वाघाच्या हल्यात शेतकरी जागेवरच ठार
वरोरा तालुक्यातील बेंबळा येथील घटना…
तालुक्यापासून ३० किलोमीटर असलेल्या अंतरावर बेंबळा गावातील शेतकरी सूर्यभान हजारे वय ७० वर्षे शेतात बैल चारत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे…
खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक ५९ लगत बफर जंगल असलेल्या शेत शिवारात बैल चारत असताना अचानकपणे वाघाने हल्ला करून ठार केले. याची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाले आहे व घटनेची पुढील तपास सुरू आहे.






