संस्था सदैव आपल्या पाठीशी आहे..
डॉ. कार्तिक शिंदे
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय (एमसीव्हीसी) विभागाचे सेवा जेष्ठ प्राध्यापक अनिल दादाजी मांदाडे सर यांचे नियत वयोमानानुसार आज दि. ३१/१०/२०२३ ला सेवानिवृत्ती निरोप समारंभ यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
निरोप समारंभ समारोहाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्राध्यापक डॉ. कार्तिक शिंदे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , सत्कारमूर्ती प्रा. अनिल मांदाडे , सौ. मांदाडे वहिनी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ कार्तिक शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्राध्यापक अनिल दादाजी मांदाडे यांनी या महाविद्यालयात ३१ वर्षाची प्रदीर्घ सेवा दिली. आज ते नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले आहे. डॉ. कार्तिक शिंदे यांनी मांदाडे सर यांनी गेले ३१ वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेल्या. त्यांना पुढील आयुष्यात काही मदत लागल्यास संस्था त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी मांदाडे सरांनी सुरवातीला विपरीत परिस्थितीत न डगमगता कार्य केले. विद्यार्थी हित लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष राहिलेत, त्यांचा पुढील आयुष्य हे सुख, समाधान आणि आरोग्यदायी जावो अशी शुभकामना व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना मांदाडे सरांनी आपल्या सेवा काळातील अनुभवांवर प्रकाश टाकला.
डॉ. ज्ञानेश हटवार यांनी आजचा दिवस हा संमिश्र भावनांचा आहे. मांदाडे सर शांत, संयमी स्वभावाचे असून त्यांनी सर्वांना आपलेसे केले, ते विद्यार्थी प्रिय राहिले, त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक सौ. उज्वला वानखेडे यांनी सेवानिवृत्ती वर कविता सादर करून त्याच्या मंगल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतुल गुंडावार सरांनी अनिल-अतुल ही जोडी मागील ३१ वर्षापासून कार्यरत होती. विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारची मदत मांदाडे सर यांनी केली, असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर जुमडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयो प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






