तालुक्यातील महाडोळी ते पाटी, महाडोळी ते चीकणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याने साधी मोटार सायकल ने प्रवास करणे अवघड झाले आहे. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याचा फटका विद्यार्थ्यांंना सुद्धा बसतो त्यांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने जाणारे नागरिक अत्यंत त्रस्थ झाले आहे. अनेक निवेदन देवून देखील या गेंड्याच्या कातडीचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली नाही. हे कलियुग आहे. संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांची हीच अवस्था आहे. अभिजीत कुडे या बाबत सतत पाठपुरावा करत आहे त्या नंतर या रस्त्याचे काम मंजूर झाले असून ते सुरू होणार तरी कधी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतकी बेकार परिस्तिथी होत पर्यंत प्रशासन झोपा काढत आहे का असा प्रश्न अभिजित कुडे यांनी केला आहे. या रस्त्याने मोठे मोठे खड्डे पडले असून, गिट्टी कुठे रस्ता कुठे हा प्रश्न पडतो आहे. तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना सैनिक अभिजित कुडे यांनी केली आहे. विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या साठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय कुडे, रोशन भोयर, राहुल डोमकावळे, राजू पुसदेकर, गजानन हीवरकर, प्रतीक कुडे, प्रमोद कुडे उपस्थित होते.






