रोटरी क्लब भद्रावती द्वारे स्वर्गीय यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय व्हावी म्हणून रोटरी क्लब भद्रावती द्वारे वाटर फिल्टर शाळेला भेट देण्यात आले.
रोटरी क्लब भद्रावती द्वारे अनेक सामाजिक कार्यामध्ये काम करत असते. याचाच एक भाग म्हणून यमुनाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर देण्यात आले.
उद्घाटनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, सचिव सुधीरभाऊ पारधे, पाष्ट प्रेसिडेंट डॉ. मला प्रेमचंद, सौ वंदनाताई धानोरकर , प्राचार्य बरडे सर हे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, सचिव सुधीरभाऊ पारधे, पाष्ट प्रेसिडेंट डॉ. मला प्रेमचंद , वंदना धानोरकर तसेच सर्व रोटरीयन यांच्या हस्ते वॉटर फिल्टर चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना अनिल धानोरकर यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश हटवार रोटरीयन यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र पुसदेकर सर यांनी केले.
कार्यक्रमाला रोटरी क्लब चे सदस्य अब्बास अजानी, हनुमान घोटेकर, वसंता उमरे, सुधीर मुडेवार, किशोर भोसकर, सुनील पोटदुखे, आनंद क्षीरसागर, किशोर पत्तीवार, दिलीप राम, शंकर डे, ए.एम. देशमुख, किर्ती गोहणे, स्नेहल अजानी, रूखसाना शेख, प्रेमा पोटदूखे, सुनीता खंडाळकर, स्वाती चारी, मनिषा ढोमणे आदी सदस्य उपस्थित होते.






