ट्रॅक्टर चालकावर कारवाईची मागणी
घमाबाई आश्रम शाळा तांडा येथील तरूण शिक्षक सुनील बरडे यांचे अपघाती निधन झाले. काल दुपारी दोन च्या सुमारास सुनील बरडे हे चंद्रपूर ला जाण्यासाठी शाळेतुन भद्रावती कडे येत असतांना एका ट्रॅक्टर चालकाने भरधाव येवून समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बरडे सर हे ५ ते ६ फुट उंच फेकल्या गेले.
अपघातानंतर त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. भद्रावतीचे ठाणेदार बीपीन इंगळे हे पुढील तपास करीत आहेत. चालक व मालक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , लहान मुलगा , आई , भाऊ
व बराच मोठा आप्त परिवार आहे.






