spot_img
spot_img
29 C
New York
Saturday, August 1, 2026

जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा भंडारा येथे संपन्न

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन, मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा जिल्ह्या तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्त्य साधून जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला वाव देण्यासाठी भंडारा जिल्हा माझी माय सरसोती कडून मान्यवरांच्या उपस्थितीत वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन झाले.

जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. सुनील डीसले सर अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ मार्गदर्शक मा. प्रा. बाळासाहेब माने सर सचिव, मराठी महासंघ मा. प्रा. संपतराव गर्जे सर कार्याध्यक्ष, मराठी महासंघ प्रमुख अतिथी प्रा. दिलीप जाधव सर जिल्हा प्रतिनिधी सांगली, प्रा. बाळासाहेब माळवे सर जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर, प्रा. अरविंद मोडक सर जिल्हा प्रतिनिधी पुणे, डॉ. ज्ञानेश हटवार, जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर प्रा. सौ. विजया मने जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, प्रा. संजय पाटील जिल्हा प्रतिनिधी रायगड,
प्रा. पोमेंद्र कटरे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया, प्रा. दीपा ठाणेकर जिल्हा प्रतिनिधी मुंबई प्रा. प्रमोद भोयर सर चंद्रपूर, प्रा. राजेश लाखे सर वर्धा आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेसाठी भंडारा जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 33 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रा. सुनील डिसले सर यांनी “अशा प्रकारच्या उपक्रमातून मराठी भाषेबद्दलची आवड विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला गती मिळते असे ” मार्गदर्शन केले.

07 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात प्रथम क्रमांक कु. पायल विठ्ठल लांबट, नगरपालिका कनिष्ठ महाविद्यालय पवनी, जिल्हा- भंडारा हीने पटकाविला. हिला मार्गदर्शक शिक्षक प्रा. प्रांजली दरवळकर लाभल्या.

द्वितीय क्रमांकावर कु. प्राची संतोष उरकुडे, न.प. नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर हिला मार्गदर्शक शिक्षक प्रा. एस. एन. लेनगुरे लाभले. कु. जिया अनिल देसाई विकास कनिष्ठ महाविद्यालय खरबी नाका भंडारा हिला मार्गदर्शक शिक्षक प्रा. अंकुश तितिरमारे सर हे लाभले. द्वितीय क्रमांक मानकरी दोघेजण ठरले. तर तृतीय क्रमांक कु.राजश्री ईश्वर वाकुळकर गांधी कनिष्ठ महाविद्यालय पहेला, भंडारा हिला मार्गदर्शक प्रा. विनोद हटवार हे लाभले. कु. आकांक्षा सुनील रहांगडाले, न.प.नेहरू कमवि तुमसर ह्यांनी प्राप्त केला.

याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून काही उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात १) कु. उत्कर्षा खुशाल शहारे, लालबहादूर शास्त्री जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा. मार्गदर्शक शिक्षक प्रा. शेंडे मॅडम, प्रा. झलके मॅडम २) कु. रक्षा ब्रिजलाल रहांगडाले. नेहरू कमवि तूमसर तर ३) कु. पायल गुलाब सार्वे न.प.नेहरू कमवी तुमसर यांचा समावेश आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मराठी विषय महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये स्पर्धक विद्यार्थी सहभागी नोंदविलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून १) प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार चंद्रपूर. २) प्रा. सौं.विजया मने गडचिरोली. ३) प्रा. मेघा राऊत, नागपूर. यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

या स्पर्धेसाठी वेळाधिकारी म्हणून प्रा. सुषमा पाटील कोल्हापूर, प्रा. सुरेखा खोत गडहिंग्लज यांनी जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय लेनगुरे जिल्हा प्रतिनिधी भंडारा यांनी कले. तर आभार प्रदर्शन प्रा. नीलिमा पंचभाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रांजली दरवळकर मॅडम , प्रा.जितेंद्र टिचकुले. प्रा. मेंढे सर, प्रा. बोपचे मॅडम, प्रा. नीलकंठ कापगते, प्रा. गोंदोळे सर, प्रा. वाहने सर, प्रा. कन्नाके सर, प्रा. कांबळे मॅडम, प्रा. रामटेके सर, प्रा. शरणागत मॅडम, प्रा. मरस्कोल्हे मॅडम, प्रा. बावणे सर, प्रा. धनगर सर, प्रा. वंजारी सर, प्रा. करंबे सर, प्रा. गिरीपुंजे सर यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!