भद्रावती : एकंदरीत या विषयावर एखादी निंबध स्पर्धा घ्यावी की काय? अशी परीस्थीती माजरी गावामधे निर्माण झाली आहे. मागील कित्येक वर्षापासुन माजरी गावच्या रस्ताचे काम अथवा डागडुजी सुद्धा करण्यात आली नाही. माजरी एरीया हाॅस्पिटल पासुन ते शिरना नदी व रेल्वे स्थानकापर्यंतचा मुख्य रस्ता पुर्णतः खराब झाला असुन ग्रामपंचायत ने तर कानाडोळा केला आहे. तरी वेकोली प्रशासनाने सुद्धा डोळे झाकुन केवळ कोळसा उत्खननाचे काम सुरु ठेवले आहे.

माजरी ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळखल्या जाते. १७ लोकप्रतीनिधी असलेल्या गावाची अशी दुर्दशा पाहुन लोकप्रतिनिधि कुठल्या कामाचे? असा संतप्त सवाल माजरीतील जनता करत आहेत. राजरोसपणे ग्रामपंचायत मार्फत वेकोली ला उत्खननासाठी नाहरकत प्रमानपत्र देण्यात येते. पण सुविधांसाठी कुठलाही पाठपुरावा केल्या जात नाही असे ह्या मुख्य रस्ताची दुर्दशा पाहुन वाटायला लागले असल्याचा एकच सुर गावकर्यांमार्फत केला जात आहे. ह्या खराब रस्तामुळे कुनाच्या जिवाला मोठे नुकसान होनार नाही तो पर्यंत कुणाला जाग येणार नाही असेच वाटत आहे. तरी हा मुख्य रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा म्हणुन गावकर्यांची इच्छा असुन गावकरी प्रतिक्षेतच दिवस काढत आहेत.






