चंद्रपूर : जिल्हाचा इतिहासात प्रथमच महिला पंच उच्च राज्यस्तरीय स्तरावर परीक्षा उत्तीर्ण चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित राज्यस्तरीय तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा नुकतीच नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला विविध जिल्ह्यातील पात्रता धारक पंच सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे वर्षा छबन कोयचाडे यांनी स्टार थ्री म्हणजेच तिसऱ्या स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच लता तिवारी यांनी स्टार टू म्हणजेच दुसऱ्या स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

चंद्रपूर जिल्हाचा इतिहासात प्रथमच महिला पंच उच्च राज्यस्तरीय स्तरावर परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहे. वर्षा व लता यांच्या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. राकेश तिवारी, कार्यकारी सचिव प्राध्यापिका संगीता बांबोडे, विजय ढोबळे, डॉ. अमित प्रेमचंद, ॲडवोकेट मिलिंद रायपुरे, डॉ. दिलीप बगडे, सुनील दैदावार, अमर भंडारवार, नेहाल डांगे, प्रा. पूर्वा खेरकर, प्रीती बोरकर, सुनिता खंडाळकर, संदीप वालदे, अतुल कुचनकर, शितल मांडवकर, प्रशांत निकोडे,कोमल वाकडे, आशिष तामगाडगे, अमित शास्त्रकार, राजू सदोरी व बॉक्सिंग खेळाडू प्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.






