भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा गुरुनगर, चिचोर्डी येथील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी संस्थेच्या वतीने बस सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या या बसला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सहसचिव डॉ. विशाल शिंदे यांनी हिरवी झेंडी दाखवली.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा गुरुनगर, चिचोर्डी भद्रावती येथे विद्यार्थ्यांच्या सेवेत बस दाखल झाली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विशाल शिंदे , सहसचिव भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, मुख्याध्यापक प्रवीण शिंदे, धीरज ताजणे हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुरक्षित ने आण करण्यासाठी संस्थेच्या वतीने दाखल झालेल्या बसला संस्थेचे सहसचिव डॉक्टर विशाल शिंदे यांनी हिरवी झेंडी दाखवली . विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.एम.देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन धीरज ताजने यांनी केले . यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.






