मागील ६ वर्षा पासून वरोरा चिमूर महामार्ग ३५३ ई चे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. या कामाचा ठेका एस. आर. के. या कंपनीला देण्यात आला असून ही कंपनी मनमानी पद्धतीने आपला कारभार करत आहे. यातच शेगाव बु मधील रोडचे काम मागील २ वर्षा पासून सुरू असून अद्यापही गावतील रोड व बाजूच्या नालीचे काम पूर्ण झाले नाही. मागील वर्षी याचा त्रास संपूर्ण शेगाव ग्रामवासी व शेतकरी यांना सहन करावा लागला होता. परंतु या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती कायम असून यावर कुठलीच उपाय योजना संबंधित कंपनीने केली नसून काल झालेल्या जोरदार पावसामुळे नालीचे पाणी अर्धवट असलेल्या कामातून गावात शिरायला लागले. जर यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर संपूर्ण शेगाव वासियांच्या आरोग्याचा प्रश्न येत्या पावसाळ्यात नक्कीच निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेगाव मधील रोड व नालीचे काम एस. आर. के. कंपनीने लवकरात लवकर करावे अशी मागणी गावकार्यांकडून होत आहे.








