चंद्रपूर : एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात सहायक प्रा. ग्रॅण्टेड सीएसबी वर कार्यरत असलेले प्रा. लोकेश दर्वे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सहायक प्राध्यापक पदासाठी २६ मार्च २०२३ रोजी घेतलेली सेट परीक्षा वाणिज्य विषयात उत्तीर्ण केली आहे. त्याआधी त्यांनी यूजीसी नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली होती.
महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडवोकेट मोगरे, सचिव सातपुते, शाळा समिती अध्यक्ष गावंडे, प्राचार्य डॉ.ठोंबरे आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. कायरकर यांचे विशेष आभार मानले. त्यांनी आपल्या आपल्या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षकांना दिले आहे.






