चंद्रपूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२२ ते २३ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात ४२ कॅन्सर रुग्णांची नोंद आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांवर मेडिकल ओंकोलॉजी या स्पेशलिटी अंतर्गत २०२२ ते जून २०२३ पर्यंत जुने व नवीन अशा ८०२ रुग्णांवर ३९०२ वेळा केमोथेरपी उपचार करण्यात आला आहे.

कॅन्सर रुग्णांना साधारणपणे ४ ते ६ वेळा उपचाराकरीता केमोथेरपी सायकलची आवश्यकता असते. सदर ८०२ रुग्णांनी या योजनेअंतर्गत ३९०२ केमोथेरपी सायकलकरीता उपचार घेतला आहे. तसेच ३९०२ हे कॅन्सर रुग्ण नसून योजने अंतर्गत जुने उपचाराधीन आणि नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या एकूण केमोथेरपी सायकल केसेसची संख्या आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी कळविले आहे.






