spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

अर्जुनीतील नागरिकांच्या घरासमोर अंधार…


अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतचे मात्र अक्षरशः दुर्लक्ष….

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला जवळपास दोन हजार वस्तीचे अर्जुनी तुकुम हे गाव असुन. हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. या गावातील काही दलित समाज बांधव यांच्या घरासमोर ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे नेहमीच अंधार राहत असून रात्रीच्या सुमारासं अंधाराचा सामना करावा लागत आहे….

अर्जुनी या गावात दलित समाजाचे कुटुंब राहत असून त्यांच्या घरासमोर आलेल्या इलेक्ट्रिक पोल वर दिवाळी सारखा सण जाऊन सुद्धा इलेक्ट्रिक खांबाला अजून पर्यंत कुठल्याही प्रकारे लाईट लागलेला नसल्याने आजही रात्रीच्या सुमारास त्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे असून ठीक ठिकाणी गंदगी पसरलेली आहे काही दिवसाअगोदर या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एक विषारी साप निघाला होता. रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतच्या अशा निष्काळजीपणामुळे मच्छर, किडे, सरपटणारे प्राणी यांच्या पासून येथील नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालेले आहे…

नेहमी सणासुदीच्या काळात तालुक्यातील ग्रामपंचायत कडून गावातील इलेक्ट्रिक खांबाला लावण्याकरीता हजारो रुपयाची लाईट घेण्यात येत असतात मात्र हे लाईट लावण्याचे काम मात्र होत नसून हे लाईट कुणाच्या घरी जात आहे? असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिकांच्या मनात उत्त्पन्न झाल्याचे दिसून येत आहे…..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!