भद्रावती
डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावती येथील प्रशासकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘ हर घर तिरंगा’ या उपक्रमा अंतर्गत निबंध स्पर्धेमध्ये उत्पुर्त सहभाग नोंदवला. यामध्ये प्रशासकीय विद्यार्थांनी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने विविध विषयावर निबंध लिहिले. स्वातंत्र्याचे महत्व, भारत आणि ब्रिटिश राजवट, ब्रिटिश राजवटीचा परिणाम, भारताची एकता, स्वातंत्र्यानंतरचे शिक्षण, स्वातंत्र्यानंतरची प्रगती, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, मूलभूत गरजा, न्यायिक धोरण इत्यादी निबंधाचे विषय होते. सदर निबंध स्पर्धा महाविद्यालयातील परिसरात पार पडली असून यावेळी महाविद्यालयाचे सचिव डॉ.कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत पाठक, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. प्रीती कनकट्टीवार, प्रा. प्रज्ञा लांडे, प्रा. नेहा मानकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग लाभला.






