spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

आष्टा नदी घाट नाला येथीन दिवसरात्र अवैध रेतीचा उपसा…

अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा कारवाई करत नसल्याचा आष्टा सरपंच यांचा आरोप….

भद्रावती तालुक्यातील आष्टा नाला मधून जोमामध्ये रेती तस्करी सुरु आहे. एकीकडे भद्रावती व वरोरा महसूल विभाग थातुर्मातूर कारवाई करीत असल्याने सध्या तालुक्यातील अर्जुनी, वायगाव, बेंबडा, आष्टा, किन्हाळा, कोकेवाडा, धानोली घाटावरून अवैध रेती दिवसरात्र उपसा होत असून कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे रेती तस्कर मात्र बेडरपने दिवसरात्र आपला व्यवसाय करीत आहे. रेती तस्कर हे दिवसाढवळ्या ट्रॅक्टर पावड्याच्या साहाय्याने नाल्यातून रेती उपसा करत असून महसूल विभागाच्या संगणमताने हा सगळा कारभार सुरु असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. संबंधित रेती उपस्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना दिली असता तुम्ही गाड्या पकडून ठेवा आम्ही कारवाई करतो अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याचे नागरिक सांगत आहे. त्यामुळे आता महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व सोबतच असलेल्या संगलमतावर आता प्रशचिन्ह निर्माण होत आहे. हे तहसील चे काही महसूल अधिकारीच जर रेती तस्कर सोबत हात मिळवणी करून असेल तर महसूल अधिकारी काही कारवाई का फक्त दाखवायलाच करतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या कडे जिल्हाधिकारी आता लक्ष पुरवून वरोरा, भद्रावती तहसील तसेच खास करून शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत होणारे अवैध रेती उपस्यावर चाप लावतील का? याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे..

आष्टा नाल्यातून अवैध रेती तस्करी करताना रेती तस्कर हे पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ ट्रॅक्टर च्या पावड्याने रेती उपसा करीत असल्याने गावातील पिण्याच्या टाकीला येणारे पाणी गडूळ येते. या बद्दल त्यांना सांगून ते ऐकत नाही. भद्रावती तहसीलदार यांना अवैध रेती बद्दल माहिती दिली असता त्यांनी गाड्या पकडून ठेवा नंतर आम्हाला फोन करा आम्ही येऊ असे सांगितले, तसेच जेव्हा पण आमचे भरारी पथक आले तर त्यांना काहीच मिळत नाही त्या वेळेला एकही अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर हाती लागत नाही असे भद्रावती तहसीलदार म्हणतात. असे आष्टा येथील सरपंच चांगदेव रोडे यांनी सांगितले..

आष्टा येथील नदी घाटातील या अवैध रेती उपसा व काही ठिकाणी असलेल्या रेती साठ्या बद्दल स्थानिक महसूल अधिकारी यांना माहिती घेतली असता मी ६ महिन्यात आता पर्यंत २/३ कारवाई केल्या आहे. व या नंतर सुद्धा जर मला अशा प्रकारे काही आढळून आल्यास मी अशा रेती तस्करांना सोडणार नसल्याचे आष्टा येथील तलाठी यांनी सांगितले..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!