चंद्रपूर
बल्लारपूर येथील कवी गझलकार सुनील बावणे – निल यांना ललित कला फाउंडेशन ठाणे चा साहित्य पुष्प पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यांचे साहित्य लेखन व नुकता नुकताच प्रकाशित झालेला बोली भाषेतील कवितासंग्रह “स्याडा कोठसा भरते या साहित्यकृतीला दिनांक ३आणि ४ मे रोजी ललित कला फाउंडेशन ठाणे व पुस्तकाचं घर शेगांव ( बु.) यांचे वतीने पनवेल येथे संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलन व गजल मुशायऱ्यामध्ये कवी सुनील बावणे यांना साहित्य पुष्प पुरस्कार प्रदान करून गझल मुशायऱ्यामध्ये गझल सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी ललित कला मंचाचे श्री दिलीप कारखानीस सर ठाणे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. ललित कला मंचाच्या वतीने तसेच त्यांचे साहित्य क्षेत्रातील चाहते व रसिक वर्ग त्यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नुकताच प्रकाशित झालेला बोली भाषेतील कविता संग्रह सध्या महाराष्ट्रभर चर्चिला जात आहे.
अनेक साहित्यिक व साहित्य संस्थाकडून या पुस्तकाबद्दल चर्चा सुद्धा होताना दिसत आहे.






